Monday, April 11, 2011

History of Parulekar Family

ब्रिटीश शासनाच्या काळात आपल्या समाजाने खऱ्या अर्थाने उभारी घेतली. त्यात परुळेकर कुटुंबीयही मागे नव्हते. विष्णु सखाराम परुळेकर हे ब्रिटीश रॉयल मिलीटरी मध्ये सुभेदार मेजर झाले. वेंगुर्ल्यात ते सुभेदार परुळेकर या नावानेच परिचित होते. सुमारे 100 वर्षांपुर्वी सुभेदार  विष्णु सखाराम परुळेकर यांनी मठ पाडलोस क्षेत्रात घर बांधले. त्यांना 13 अपत्ये होती. डॉ.रामचंद्र, गंगाधर, चंद्रकांता, श्रीधर, नीळकंठ, काशीनाथ, दुर्गा, मुक्ता, हीरा, विश्वनाथ, वामन, राजाराम आणि  भालचंद्र . पाडलोसचे जुने घर हे या सर्वांचे मूळ घर मानले जाते. आजही या मूळ घरात पूर्वांपार चालत आलेल्या सर्व परंपरा पाळल्या जातात. सण ऊत्सव साजरे केले जातात. प्रतीवर्षी नागपंचमी, गणेश् पुजन, अनंत चतुर्दशी, ब्राम्हण भोजन निर्वीघ्न पार पडत.

सुभेदारांना तीन पत्नी होत्या. पहिल्या पत्नी लक्ष्मी परुळेकर यांना एक मुलगा होता. डॉ. रामचंद्र परुळेकर. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुभेदारांनी दुसर लग्न केल. दुसऱ्या पत्नीचे नावही लक्ष्मी परुळेकर. त्यांना तीन अपत्ये होती. गंगाधर परुळेकर, चंद्रकांता परुळेकर आणि श्रीधर परुळेकर. दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुभेदारांनी तिसरे लग्न केल. तिसऱ्या पत्नीचे नावही लक्ष्मी परुळेकर.  त्यांना नऊ अपत्ये होती. नीलकंठ परुळेकर, काशीनाथ परुळेकर, दुर्गा परुळेकर, मुक्ता परुळेकर, हिराबाई परुळेकर, विश्वनाथ परुळेकर, वामन परुळेकर, राजाराम परुळेकर आणि भालचंद्र परुळेकर. या सर्व तेरा मुला-मुलींचे परिवार आज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. बरेचजण मुंबईत स्थायिक झालेत. काही गुजराथला, रत्नागिरीला, पुण्याला. तर काही विदेशात. या परिवाराबद्दलची अधिक माहिती मी वंशवेल या लेखात देईन.

धन्यवाद .  

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...