Thursday, April 14, 2011

नवीन यु आर एल

नवीन यु आर एल
           
२००५ साली परुळेकर ऑनलाईन ही वेबसाइट मी जिओसिटीज या होस्टींग सर्विस वर सुरु केली होती. पण दुर्दैवाने २६ ऑक्टोबर २००९ ला जिओसिटीज बंद झाली व आपले संकेतस्थळही बंद झाले. पुन्हा २०१० साली मी फ्रीवेबहोस्ट सर्विस वर परुळेकर ऑनलाईन ही वेबसाइट सुरू केली ती २०११ च्या जानेवारीत बंद झाली. आज एप्रिल २०११ रोजी मी पुन्हा एकदा हे संकेतस्थळ सुरू करत आहे. जुने सगळे लेख आणि माहिती पुन्हा प्रकाशित करण्यात येईल. या संकेतस्थळाचा फायदा परप्रांतात स्थिर झालेल्या परुळेकराना झाला आहे आणि तो होत राहील. मठ गावातील महत्वाचे सण, बातम्या आणि इतर कार्यक्रम याची माहिती या संकेतस्थळावर मिळत राहील.       

परुळेकर ऑनलाईनचे  जुने डिझाईन (२००५-२००९ )





 गेली सहा वर्षे जो तुमचा प्रतिसाद मिळालाय त्याबद्ल मी आपला आभारी आहे. केवळ परुळेकरच नव्हेत तर इतर लोकांनीही हे संकेतस्थळ पाहिले आणि शुभेच्छा दिल्या मी त्यांचाही आभारी आहे. आपला प्रतिसाद आणि प्रेम असेच आमच्यावर राहू द्या ही विनंती. 

- आपला वामन राधाकृष्ण परुळेकर   

1 comment:

Anonymous said...

नमस्ते....आपण कृपया आपला पत्ता व संपर्क क्रमांक द्याल का??

Related Posts Plugin for WordPress, Blogger...